चंद्रकांत पाटील आपली मर्यादा ठेवून बोला, अशी भाषा शोभत नाही – धनंजय मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले जात आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असे म्हंटले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले असून चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला आहे. “चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्याबाबत बोलताना जपून बोलावे. पाटलांना अशी भाषा शोभत नाही,” असे मुंडे यांनी म्हंटले आहे.

मंत्री मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील भाजपमधील एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांना अशा प्रकारची भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भाजपाच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी टीका करताना म्हंटले होते की, “मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे की, एवढा यांना शाहरूख खानच्या मुलाचा पुळका का आला? म्हणजे नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर म्हणणार, मग महाराष्ट्र सरकार आता काय सर्वोच्च न्यायालयात जाणार. महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही.”

Leave a Comment