शिवसेना प्रवेशाबाबत छगन भुजबळ यांनी दिले हे उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार अशा चर्चा माध्यमात झळकत होत्या. मात्र त्या चर्चा शक्यता आणि सूत्रांनी दिलेल्या बातम्यांना छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहे. तसेच त्यांनी मी साहेबां सोबत आहे. मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही असेम्हणले आहे.

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक ; सुरु आहे भाजपमध्ये जाण्याची तयारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात पार पडत आहे. या बैठकीसाठी पुण्यात आलेल्या छगन भुजबळ यांच्याशी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. मी राष्ट्र्वादीतच आहे. वावड्या उठवण्याचे काम माध्यमं करत आहेत. त्यांनी ते करावं परंतु तुमचे सूत्र कने आहेत हे माध्यमांनी स्पष्ट करावे. मी आजही साहेबांच्या सोबत आहे. आज बैठकीला पुण्यात आलो आहे एवढंच बसं असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार या बातमीने महाराष्ट्र ढवळून निघाला होता. मात्र सध्या तरी छगन भुजबळ यांनी स्वतः आपल्या विधानाने या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीची आज महत्वाची बैठक आज पुण्यात पार पडत आहे. या बैठकीचे आयोजन शरद पवार यांनी केले आहे. या बैठकीला अजित पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीचे नेते उपस्थित आहे. या बैठकीत राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीची व्हिव रचना ठरवली जाणार आहे.