भाजपचा पराभव फाजिल नेतृत्वामुळे, ‘मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही’, एकनाथ खडसेंचा घणाघात

जळगाव । विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचपैकी एकाही जागेवर भाजपला वर्चस्व मिळवता आलं नाही. यानंतर महाविकास आघाडीचे नेते भाजपवर निशाणा साधत आहेत. “विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही” अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल चढवला.

“अहम्-पणाचा पराभव झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही. पुणे आणि नागपूरसारखा परंपरागत मतदारसंघ भाजपच्या हातून गेला. लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. (BJP’s defeat in Graduate and Teachers constituency Election Results)

“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणतात, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही, आम्ही हिमालयात जाऊन बसू, यांच्या नुसत्या गप्पा असतात” असं म्हणत खडसेंनी चंद्रकांत पाटलांनाही टोला लगावला.“महाविकास आघाडीच्या एकीचे हे प्रदर्शन झाले आहे. भाजपचे नेतृत्व कमी झाले आहे. पक्षात हम करे सो कायदा होता, म्हणून हा पराभव झाला” असा घणाघातही खडसेंनी केला. (Eknath Khadse) (Devendra Fadnavis)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

You might also like