शिंदे – फडणवीस सरकार 2024 पर्यंत कोसळणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान

Eknath Shinde Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. मात्र, शिंदे व फडणवीस यांच्या सरकार पडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. “2024 पर्यंत शिंदे व फडणवीस सरकार टिकणार नसून ते पडेल आणि निवडणुका लागतील, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपलाही हे माहिती आहे कि हा प्रासंगिक करार आहे. हे सरकार किती दिवस टिकणार आहे? किंवा ते 2024 मध्ये निवडून येतील कि नाही हे सांगता येत नाही. मला असे वाटते कि त्यापूर्वीच 2024 मध्येच निवडणूक होईल. आणि आताचे नेते तेव्हा निवडून येतील कि नाही हे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाही आता चांगलेच माहिती आहे. परिणामी यांच्यावर किती अवलंबून राहायचे हे भाजपला ठरवावे लागेलच, असे पाटील यांनी भाकीत केले.

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन व शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन चोवीस तास झाले नाही तोवर सरकार पडणार असल्याचे भाकीत राजकीय नेत्यांकडून केले जाऊ लागले आहे. आज जयंत पाटील यांनीही सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे भाकीत केले आहे.