…तर भाजप आमच्यापासून लांब नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असलं तरी त्यांच्यातील अंतर्गत कुरबोडी वारंवार समोर आल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. आम्ही कोणाबरोबर युती, आघाडी करायची याचे सर्व पर्याय खुले आहेत अस म्हणतानाच भाजप आम्हाला लांब नाही असा इशारा त्यांनी दिला. ते नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची. तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत,” असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.