दाऊदचा पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन केले, वानखेडे मुस्लिमच; मलिकांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. “समीर वानखेडे जन्माने मुस्लिम आहे. आजही मी वक्तव्यावर ठाम आहे. संपूर्ण कुटुंब मुस्लिम समाजाप्रमाणे वागत होते. दाऊदचं पुन्हा ज्ञानदेव, यास्मिनचं जास्मिन नाव केले. वानखेडेंनी नोकरीसाठी नाव बदलण्याचे काम केले आहे. या प्रकाराबाबत आपण सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते मलिक यांनी म्हणत हल्लाबोल केला आहे.

नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल ट्विट केलेल्या फोटोतील व्यक्ती समीर वानखेडे यांचा मेहुणा आहे. मी आजही म्हणतो वानखेडे जन्माने मुस्लिम आहे. बोगस दाखले दाखवून वानखेडे यांनी नोकरी मिळवली आहे. वानखेडे कुटुंबियांकडून नाव बदलण्याचा खेळ केला गेला आहे. नाव बदलण्यासाठी समीर वानखेडे यांनी आपले पहिले लग्न तोडून दुसरे लग्न केले.

भाजप नेते अरुण हैदर या नेत्यांची नेमणूक हि एका संविधानिक पदावर नेमणूक झाली आहे. त्यांनी थेट माध्यमांशी बोलून समीर वानखेडे यांना क्लीनचित देतायत. यामध्ये कुठेतरी डाळ मी कुछ काला है असे वाटत आहे. फर्जीवाडा करून नोकरी मिळवण्याचे काम केले जात आहे. आणि सामाजिक न्याय विभागाकडून नुसती बघ्यांची भूमिका केली जात आहे, असे मलिक यांनी म्हंटले आहे.

हिवाळी अधिवेशनात त्या भाजप नेत्याचे बिंग फोडणार – मलिक

राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनी आतापर्यंत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत अनेक धक्कादायक पुरावे सादर केले आहेत. यानंतर त्यांनी आता भाजपवर निशाणा साधला आहे.  “किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत आहेत. आम्हाला काय धमक्या देताय. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्यानिशी घोटाळे उघड करणार आहे, असे सूचक विधान मलिक यांनी केले आहे.

Leave a Comment