पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी शुक्रवारी एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलकांनी हल्ला केला. यानंतर राज्याच्या अनेक स्तरा्तून या घटनेचा निषध नोंदवण्यात आला. अगदी भाजपच्याही काही नेत्यांनी सोशल मिडियाद्वारा या प्रसंगाचा निषध व्यक्त केला.
मात्र भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेत राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी झालेल्या मोर्चाचा संबंध आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लावणे चुकीचं आहे असे विधान वाघ यांनी केले होते. यावरुन राष्ट्रवादीने आता चित्रा वाघ यांना चांगलेच झापले आहे.
https://twitter.com/JagtapSpeaks/status/1512501334473424904
राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी चित्रा वाघ यांचे ट्विटला प्रत्युत्तर दिलंय. बापाच्या घरावर हल्ला झाला तरी लेकीला फडणवीसचीच वकिली करावी वाटतेय असं म्हणत जगताप यांनी वाघ यांना टोला लगावला आहे.
‘बापाच्या घरावर हल्ला झाला तरी या लेकीला भाजप अन फडणवीसची वकिली कराविशी वाटतेय…
नवऱ्याचं घबाड लपवण्यासाठी बापाच्या जीवावर उठलेली पहिलीच लेक असेल.’ अशा आशयाचे ट्विट प्रशांत जगताप यांनी केले आहे.