स्वतःच्या मुलावर खंडणीचा आरोप असताना आता किरीट सोमय्या गप्प का ?? राष्ट्रवादीचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांची एका जुन्या वादातून पोलिस चौकशी झाली आहे. नील सोमय्यांची खंडणीच्या एका जुन्या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या सतत महाविकास आघाडी सरकार वर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत असतात. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी किरीट सोमय्यांना या प्रकरणी घेरलं असून आता सोमय्या गप्प का?, असा सवाल केला आहे.

किरीट सोमय्या यांच्या मुलाची खंडणीप्रकरणी चार तास कसून पोलिस चौकशी झाली आहे. यावर आता किरीट सोमय्या गप्प का?, असा त्यांनी केला आहे. तसंच, ज्याला कर नाही त्याला डर कशाची, असा प्रश्नही आमच्या मनात येतो. यासंबंधी किरीट सोमय्या यांनी त्यांच्या मुलाच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तपासे यांनी केली आहे.

नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण?

भाजप नगरसेवक नील सोमय्या यांचे नाव एका खंडणीच्या प्रकरणात आले होते. हे जुने प्रकरण असून याप्रकरणी नील यांची नव्याने चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात नील यांचा जबाब नोंदवण्यात आला. नील यांच्यावर बिल्डरकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला असला तरी अद्याप याप्रकरणी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असेही कळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like