हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुंबईत एका कार्यक्रमात भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “शिवसेनेने भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर जत्रा अशी टीका केली. मात्र ज्यांना जत्रेचा अनुभव आहे, त्यांना दुसरं काय दिसणार,”असे फडणवीसांनी म्हंटले आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले असून “भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचं जत्रेत केंव्हाच रूपांतर झालंय,” असे मिटकरींनी म्हंटले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करीत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “भाजपाला सत्तेची हाव की डोक्यात सत्तेची अजुनही हवा? जनतेच्या मनोरंजनासाठी सुरु केलेल्या जनआशीर्वाद यात्रेचं जत्रेत केंव्हाच रूपांतर झालंय हे त्यांना कळले पण नाही.”
भाजपाला सत्तेची हाव की डोक्यात सत्तेची अजुनही हवा? जनतेच्या मनोरंजनासाठी सुरु केलेल्या जनआशीर्वाद यात्रेचं जत्रेत केंव्हाच रूपांतर झालंय हे त्यांना कळले पण नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 23, 2021
मुंबईत टीव्हीजे हा लसीकरणाच्या कार्यक्रम प्रसंगी भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप जन आशिर्वाद यात्रेवरून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले. त्यामुळे फडणवीसांच्या टीकेला आता आघाडी सरकारमधील नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, आज मिटकरी यांनी फडणवीसांवर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.