Saturday, February 4, 2023

पडळकराचे शरीर माणसाचे आणि तोंड डुकराचे; राष्ट्रवादी आमदाराची जहरी टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. याच दरम्यान आता राष्ट्रवादी देखील आक्रमक झाली असून आमदार किरण लहामटे यांनी पडळकरांवर जोरदार निशाणा साधला आहे. पडळकराचे अंग माणसाचे आणि तोंड डुकराचे आहे अशी जहरी टीका त्यांनी केली.

आमदार किरण लहामटे म्हणाले, गोपीचंद पडळकराचे अंग माणसाचे आणि तोंड डुकारचे आहे. त्याला इकडे तोंड घालायची सवय लागली आहे. त्यांनी गटरामध्ये लोळण बंद केले पाहिजे.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, मला एकाने सांगितले आहे दोस्ती करायची तर चांगल्याशी करायची, डुकारशी केली तर सगळी घाण अंगाला लागते. जर पडळकर जास्तच रस्त्यावर आला तर आम्ही आदिवासी आहोत डुकराची शिकार करण्यात आम्ही तरबेज आहोत, असं म्हणत त्यांनी पडळकरांवर निशाणा साधलाय.