मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार पक्षाला सोडून चालल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. आज राष्ट्रवादीला असाच एक धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सादर केला आहे. त्यांनी राजीनामा सादर केला त्यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे त्यावेळी त्यांच्या सोबत उपस्थितीत होते.
पांडुरंग बरोरा हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे. स्थानिक राजकारणाची सूत्र बघता ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे अशी माहिती देखील समोर अली आहे.
दरम्यान महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले आहे. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या तीन नेत्यांमध्ये चर्चा होऊन मुख्यमंत्री पदाबाबत नाव अंतिम होईल असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे विठ्ठलाच्या महापूजेला एकत्रित जाणार आहेत का या बद्दल मला काहीच माहिती नाही मात्र ते जर एकत्र जाणार असतील तर हि चांगली बाब आहे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.