Monday, February 6, 2023

‘ही’ चूक झाली नसती तर… ; रोहित पवारांचे ‘ते’ ट्विट बनलं चर्चेचा विषय

- Advertisement -

मुंबई । कोरोना संकटामुळं (covid19 pandemic) राज्याच्या तिजोरीला फटका बसला आहे. कोरोनासोबतच ‘निसर्ग’ चक्रीवादळ, ‘अतिवृष्टी’ या संकटांमुळंही राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. यावरुनच राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्रानं जीएसटीचे (GST Compansation) पैसे थकवल्याचा आरोप वारंवार होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या मुद्द्यावर एक ट्विट केलं आहे.

रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. ”निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून २०१५-१६मध्ये तत्कालीन राज्य सरकारच्या घाईघाईत ३२९० कोटी रुपयांचा एलबीटी माफ करण्याच्या चुकीमुळं राज्याचं २८००० कोटींपेक्षा अधिक नुकसान झालं. ही चूक झाली नसती, तर यंदा अंत्यत अडचणीच्या वर्षात आपल्याला जीएसटी भरपाईपोटी ६३०० कोटीपेक्षाही अधिक निधी मिळाला असता,” असं म्हणत रोहित पवारांनी पु्न्हा एकदा केंद्र सरकारवर (central government) निशाणा साधला आहे.

- Advertisement -

जीएसटी भरपाईचे पैसे हे आपल्या हक्काचे आहेत, कारण आपण स्वतः नुकसान सोसून आपला कर जमा करण्याचा हक्क केंद्र सरकारला दिलाय. हक्काच्या जीएसटी भरपाईच्या पैशासाठी विरोधी पक्षासह सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मागणी करायला हवी. कदाचित यामुळं पूर्वीच्या चुकांचं प्रायश्चित्त तरी घेता येईल, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’