व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे चुकीचे; रोहित पवारांनी घेतली मोदींची बाजू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये संबोधनावेळी पंतप्रधान मोदी भाषण करताना तांत्रिक अडचणी मुळे टेलिप्रॉम्प्टर अचानक थांबल्याने आणि पंतप्रधान मोदींना पुढे बोलता आलं नाही. यानंतर विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे योग्य नाही अस म्हणत मोदींची बाजू घेतली आहे.

रोहित पवारांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, इकॉनॉमिक फोरम’च्या ऑनलाईन बैठकीत काल बोलत असताना Teleprompter बंद पडल्याने पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय… अनेकजण याबाबत खिल्ली उडवतात… पण मला वाटतं अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे… असे रोहित पवार यांनी म्हंटल.

एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर पंतप्रधान बोलत असताना ते देशाचे प्रतिनिधी म्हणून बोलत असतात. अशा वेळी Teleprompter चाच आधार घ्यावा लागतो. यावेळी चुकूनही एखादा शब्द चुकीचा गेल्यास ते देशासाठी परवडणारं नसतं. त्यामुळं या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही! अस परखड मत रोहित पवार यांनी मांडले.