मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले होते. राज्यपालांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला होता. हा वाद ताजा असतानाच आता पुन्हा एकदा भाजप प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाचवेळा पत्र लिहिलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) चांगलेच आक्रमक झाले आहेत.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानावर संताप व्यक्त करताना अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले नेमकं तुम्हाला काय खुपतय?, असा थेट सवाल त्यांनी भाजपाला केला आहे. छत्रपतींविषयी तुमचे राज्यपाल आणि प्रवक्ते बेताल वक्तव्य करतात, तुम्हाला नक्की काय खुपतय?, धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये. धर्मसत्ता आणि राजसत्तेने एकत्र येऊन लोककल्याणाचे काम करावे ही छत्रपतींनी दिलेली शिकवण तुम्हाला खुपते का? असा सवाल अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी यावेळी उपस्थित केला.
रोहित पवारांनी देखील घेतला समाचार
रोहित पवार यांनी ट्विट करून सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता डोक्यावरून पाणी चाललंय.त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आली आहे, असा इशारादेखील रोहित पवार यांनी यावेळी दिला.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय