पार्थ पवारांच्या ‘त्या’ ट्विटबाबत विचारणा करताचं सुप्रिया सुळेंनी जोडले हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर ”सत्यमेव जयते ”असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं होतं. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंना आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंना पार्थच्या प्रतिक्रियेबाबत विचारलं असता, त्यांनी त्यांनी यावर हात जोडत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पार्थ पवार यांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. याशिवाय पार्थच्या ट्विटचा अर्थ कुणी कसाही लावू शकतो, अशी सावध प्रतिक्रिया चुलत बंधू रोहित पवार यांनी दिली. तर पार्थ यांच्या प्रतिक्रियेमुळे राष्ट्रवादी पक्षाला काही डॅमेज होईल, असं वाटत नसल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.

काही दिवसांपूर्वी सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. या मागणीचं पत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून दिलं होतं. यानंतर पार्थ पवारांना शरद पवारांनी खडसावलं. पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य रंगलं. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर पार्थ पवार कमालीचे नाराज झाले. त्यांनी पवार कुटुंबातल्या अनेकांची भेट घेतली. तसंच पार्थ पवार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत, त्याआधी ते कुटुंबाची भेट घेत असल्याचंही बोललं गेलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”