हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. आपण मुख्यमंत्री नसून राज्यपाल आहोत हे राज्यपालांना समजायला हवा असे टोलाही त्यांनी लगावला
राज्यपालांकडून सत्तेची २ केंद्रे बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने केलेल्या कामाचे ते उदघाटन करतात सरकारला न विचारता राज्यपाल त्यांचा कार्यक्रम जाहीर करतात असं म्हणत महाविकास आघाडीने राज्यपालांच्या दौर्यावर आक्षेप घेतला आहे
राज्याचे मुख्य सचिव राजभवनावर जाऊन राज्यपालांच्या सचिवांना भेटतील आणि याना सरकारचा संदेश देतील असे नवाब मालिकांनी सांगितले. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते त्यामुळे आता पण त्यांना मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असेल पण त्यांना कळलं पाहिजे कि ते मुख्यमंत्री नाहीत असा टोला मालिकांनी लगावला