हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना काळातील सरकारच्या कामगिरी वरून टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोरोना काळात गुजरात, उत्तरप्रदेश सारखी अवस्था महाराष्ट्राची झाली नाही असे म्हणत मलिकांनी फडणवीसांच्या आरोपांचे खंडन केलं.
नवाब मलिक म्हणाले, कोरोना काळात महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावी राज्य होतं. राज्यात सुरुवातील एकच लॅब होती. देशाने किंवा केंद्राने निर्णय घेण्याआधी महाविकास आघाडीने कोरोना संसर्गाला गंभीरपणे घेतलं. गुजरातमध्ये मृत्यूचा आकडा लपवण्यात आला. उत्तर प्रदेशात गंगेत मृतदेह सोडण्यात आले. इतर राज्यात ऑक्सिजनशिवाय मृत्यू झाले. गुजरात, उत्तर प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात झाली नाही, असं त्यांनी सांगितलं.
शासनाने डेडिकेटेड कोविड सेंटर उभे केले होते त्याठिकाणी रुग्णांना चांगल्या सुविधा दिल्या, तेथे रुग्णांना बेड मिळालेत. सरकारी रुग्णालयात एकही बेड नव्हता, म्हणून रुग्ण दगावले नाहीत. सरकारी रुग्णालयातही बेड आणि ऑक्सिजनची पूर्तता होत होती. केवळ, रुग्णांच्या नातेवाईकांच्या सिलेक्टीव्ह मागणीच्या ठिकाणीच या अडचणी जाणवल्या आहेत असे म्हणत मंत्री नवाब मलिक यांनी कोविड काळात राज्य सरकारने चांगलं काम केल्याचं प्रमाणपत्रच दिलंय.