तेव्हा शरद पवारांना पाठवलेली नोटीस मागे का घेतली? ; राष्ट्रवादीचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. राऊत यांच्या पत्नीला पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “भाजपाच्या विरोधात असणाऱ्यांना सुडबुद्धीने नोटीस पाठवली जात आहे. भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,”असा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.

महाराष्ट्रासाठी ईडीचा (ED) खेळ हा नवा नाही. भाजपच्या विरोधात असणाऱ्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवली जाते. या माध्यमातून केंद्र सरकार विरोधकांची बदनामी करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. “तुमच्या ‘ईडी’च्या कारवाईला कोण घाबरतंय?,” असा सवाल करत मलिक म्हणाले,”यापूर्वी ईडीने शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. मग ती नोटीस मागे का घेतली?,” असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. “सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजपाला सत्ता मिळेत, असे वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, असंही मलिक यांनी म्हटले आहे.

फडणवीसांचा राऊतांना टोला

दरम्यान, कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही आणि चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे कारण नाही”, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच मी काही ईडीचा प्रवक्ता नाही त्यामुळं जे काही विचारायच ते ईडीलाच विचारा अस म्हणून त्यांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like