किरीट सोमय्या नेहमी शेणंच पाहतात; नवाब मलिकांचा घणाघात

Malik Somaiya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कोव्हिड सेंटर्सच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांना दूध देणारी म्हैस दिसत नाही कारण ते कायम शेणच पाहतात अशी घणाघाती टिका नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंबईतील कोव्हिड सेंटरमुळे अनेकांचे जीव वाचत आहेत. एकही रुग्णाचा उपचाराशिवाय किंवा ऑक्सिजनशिवाय मृत्यू होत नाही. याउलट गुजरातमध्ये करोनाबाधितांचे खरे आकडे लपवून ठेवले जात आहे. पण किरीट सोमय्या महाराष्ट्रातील परिस्थितीवर टीका करत आहेत. खर तर त्यांना दूध देणारी म्हैस दिसत नाही कारण ते कायम शेणच पाहतात असे मलिक यांनी म्हंटल.

यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांचाही समाचार घेतला. शाळा बंद केल्याने सदाभाऊ खोत टीका करत आहेत, पण केंद्रानेच शाळा बंद करायला सांगितल्या आहेत असे नवाब मलिक यांनी म्हंटल. तसेच देशात पहिल्या लॉकडाऊनंतर केंद्रानेच सर्वप्रथम दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यांनी शाळा बंद ठेवून बार सुरु का ठेवले जातात, याचा जाबही सदाभाऊ यांनी मोदींना विचारावा, असे नवाब मलिक यांनी म्हटले.