Wednesday, February 1, 2023

पंतप्रधान मोदी हे मेहुलभाई, मेहुलभाई बोलत होते, मग तो देशातून पळाला कसा? राष्ट्रवादीचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेहुलभाई… मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा?, जेवढी तत्परता चोक्सीला भारतात आणण्यासाठी आता दाखवली जात आहे, तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही,’ असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.

मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले. मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे. परंतु नीरव मोदी… विजय मल्ल्या… यांना कधी आणणार आहात. जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणार्‍यांची मोठी तुकडी कार्यरत आहे, असेही मलिक म्हणाले. मेहुल चोक्सीला आणण्याचा प्रश्न नाही तर तो पळाला कसा हा खरा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे आणि जनता आता उपस्थित करत आहे. असे नवाब मलिक यांनी म्हंटल.

- Advertisement -

काय आहे प्रकरण –

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी, हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला डॉमनिकन पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकार मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. चोक्सीचं प्रत्यार्पण केलं पाहिजे असं डॉमनिकन कोर्टानंही म्हटलं आहे. या सर्व प्रकरणावरून विरोधकांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.