पवार साहेबांवरील टीका खपवून घेतली जाणार नाही; निलेश लंकेंचा पडळकरांना इशारा

0
36
padalkar nilesh lanke
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून इथून पुढे पवार साहेबांवरील टीका खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दांत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पडळकरांना इशारा दिला आहे.

नीलेश लंके म्हणाले, शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर खालच्या शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं असल्याचं सांगत अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेणार नाही असे निलेश लंके यांनी म्हंटल तसेच महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अश्याप्रकारे वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही अस म्हणत त्यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले –

सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले होते. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत अस म्हणत रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्ला चढवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here