हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या घरांवर ईडी कडून छापेमारी केली जात आहे. शंभर कोटी वसूली प्रकरणी सीबीआयकडून पाचव्यांदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापा टाकला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप व ईडीच्या कारवाईवर टीका केली. “पाच वेळा एकाच घरात चौकशी कशी काय केली जाऊ शकते. वास्तविक, पाहता सर्व तपास यंत्रणांचा वापर राजकीय दृषीनं केला जात असल्याचे पाहायला मिळत असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे.
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे काम सुरु आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकला. पाच वेळा एकाच घरात चौकशी करणं किती योग्य याचा विचार जनतेनंच करायला हवा.
https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/174934201466209
लखीमपूरच्या मुद्दावर पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केले की, मावळमध्ये काय घडलं? मावळमध्ये शेतकरी मृत्यूमूखी पडले. पण त्यांच्या मृत्यूला कोणत्या राजकीय पक्षाचे नेते नव्हते. मावळच्या शेतकऱ्यांवर जो गोळीबार झाला. त्याबाबत लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांवर मोठी नाराजी होती. तिच स्थिती आज लखीमपूरच्या बाबतीत आहे.