हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारवर विरोधी पक्षांकडून अनेकवेळा अनेक कारणांनाही निशाणा साधला जातो. तर मोदीं विरोधात विरोधकांकडे चेहरा नसल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जाते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्याविरोधातही नेतृत्व नव्हते. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि नेतृत्व उभे राहिले. त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही, असे म्हणता येणार नाही, असे पवार यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशात ज्यावेळी आणीबाणी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. त्यांनी ज्यावेळी आणीबाणी लावली. त्यावेळी त्यांच्याविरोधातही नेतृत्व नव्हते. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि नेतृत्व उभे राहिले. त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही, असं म्हणता येणार नाही, असे पवार यांनी सांगितले.
त्रिपुरातील घटनेच्या महाराष्ट्रात उमटलेल्या पडसादाविषयी पवार म्हणाले की, क त्रिपुरामध्ये जे घडले आहे. ते महाराष्ट्रात घडणे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या आहेत. राज्य सरकार चांगले काम करत असताना बंदचा निर्णय नैराश्यातून घेण्यात आला. तीन चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केले जात आहे, असल्याचे पवार यांनी म्हंटले.