छापा टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल आयकर विभागाच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पावर यांच्या मुंबईतील कार्यालयावर छापे टाकरण्यात आले. आयकर विभागाच्या छाप्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यश शरद पवार यांनी आयकर विभागाच्या कारवाईवर निशाणा साधला आहे. “कर वसुली करण्यासाठी जर कोणाला काही शंका येत असेल तर त्यासंबंधीच्या चौकशी करण्याचा अधिकार आहे. मात्र, या व्यवहाराशी संबंध नसलेल्या मुलींवरही छापे टाकणे हा या अधिकाराचा अतिरेक आहे,” असे पवार यांनी म्हंटले आहे.

आयकर विभागाच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले, “आयकर विभागाने विविध ठिकाणी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर अजित पवार यांनी त्यावर मत व्यक्त केले आहे. आयकर विभागाने आपल्याला अधिकार दिला आहे म्हणून त्या अधिकाराचा वापर कुणासंदर्भात करायचा याचाही विचार करणे गरजेचे आहे.

“आज जे काही घडलं ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे घडत आहे. शेतकरी आपली भूमिका मांडण्यासाठी जात असताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांची वाहने त्यांच्या अंगावर जातात. आयकर विभागानेही चौकशी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. काही संस्था किंवा त्याच्याशी संबंधित प्रमुख असतील त्यांच्यासाठी चौकशी केली जात असेल तर काही हरकत नाही मात्र, या व्यवहाराशी संबंध नसलेल्या मुलींवरही छापे टाकणे हा या अधिकाराचा अतिरेक आहे,”असे पवार यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment