अमित शहा यांच्या भेटीबद्दल पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीबद्दल महाराष्ट्रात मात्र अनेक तर्क वितर्क लढवले गेले. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल? याबद्दल दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा केली गेली. अखेर शहा यांच्या भेटीबद्दल शरद पवार यांनी कारण सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेअध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीबद्दल पवारांनी माध्यमांना सांगितले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमवेत आज नवी दिल्लीत एक संक्षिप्त बैठक घेतली आणि एनएफसीएसएफचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे यांनी साखर सहकारी क्षेत्रासमोरील समस्यांवर चर्चा केली.

सहकारमंत्री शहा यांच्या भेटीवेळी त्यांच्याकडे महत्वाची मागणी केली असल्याची माहिती पवार यांनी दिली. यावेळी पवार यांनी सांगितले की, एमएसपी आणि साखर कारखान्यांच्या आवारात इथेनॉल उत्पादन युनिट उभारण्यासाठी परवानगी यासारख्या दोन सर्वात उदयोन्मुख आणि गंभीर समस्या आम्ही त्याच्या निदर्शनास आणल्या. आम्हाला आशा आहे की सहकार मंत्री या समस्यांवर अनुकूलपणे विचार करतील आणि लवकर सोडवतील.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. शरद पवार यांनी अमित शहा यांच्यापूर्वी प्रथम पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. दोघांमध्ये जवळपास 57 मिनिटे चर्चा झाली होती.