युतीत असताना बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, पण आता…रोहित पवारांनी भाजपला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने हाहाकार केला असला तरी राजकीय वातावरण गरमच आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप नेहमी एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार अतुळ भातखळकर यांना चांगलंच धारेवर धरलंय.

युतीत असताना बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडं फक्त उद्धवजींचे वडील म्हणून पाहता? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला सुनावलं आहे.

केंद्र सरकारने यंदा आपले हक्काचे #GST चे २०८३३ कोटी ₹ बुडवले. २४ ते ३० एप्रिलसाठी ४.३४ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा करूनही राज्याला कालपर्यंत केवळ २.२४लाख इंजेक्शन्स मिळाले. महाराष्ट्राची कोंडी होत असताना आपण मात्र मौन बाळगता! आपला मराठी बाणा दिल्लीसमोर झुकला की काय? असे  रोहित पवार यांनी  म्हंटले.

काय आहे प्रकरण

देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आहे. पण देशात नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे प्राधान्य कशाला द्यावे याचा विचार करण्याची गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले होते. त्यावर अतुल भातखलकर यांनी प्रत्युत्तर दिले होते.

मुख्यमंत्री 400 कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरत आहेत. त्यांना रोहित पवार यांनी लसीकरण महत्त्वाचे की काय हा प्रश्न विचारावा. आपल्या गृहमंत्र्याने फ़क्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे असे म्हणतात. ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी,” अशी टिप्पणी भातखळकर यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like