खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपची जुनी सवय; पेट्रोल -डिझेल दरवाढीवरून रोहित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

rohit pawar fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेलच्या दरवाढी वरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीला राज्य सरकारला जबाबदार धरले असून जर आपण 100 रुपयेचं पेट्रोल घेतलं तर राज्याला तब्बल 42 रुपये मिळतात असा आरोप केला आहे. फडणवीसांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देत भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही.

केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रु मिळत असल्याचे सांगतात.

विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही.

फडणवीस नेमकं काय बोलले होते-

पेट्रोल डिझेल चे ऑइल आपल्याला ३० रुपयांना मिळत पण त्याच्यावरील प्रोसेसिंग चे चार्जेस आणि ट्रांस्पोर्टेशन चार्जेस सहित केंद्र सरकार त्याच्यावर ३२ रुपये टॅक्स लावत त्यातील १२ रुपये राज्याला मिळतात आणि राज्य सरकार त्यात अजून ३० रुपये वाढवत. म्हणजे आपण जर १०० रुपयाचे पेट्रोल घेतले तर त्यातील ४२ रुपये हे राज्याचे आहेत असं फडणवीसांनी म्हंटल होत.