हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना धमकीवजा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. कोल्हापूर महापुरातील तुमच्या देदीप्यमान कामगिरी मुळेच तुम्हांला पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणघेणं नाही. चंद्रकांत पाटील, कोल्हापूर पूर परिस्थितीत आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे आपल्याला आपला मतदारसंघ सोडून आमच्या पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदार संघ निवडावा लागला. सुज्ञास फार न सांगण्यास लागे,’ असा म्हणत रूपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर पुर परिस्थितीत आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे ,आपल्याला आपला मतदार संघ सोडून आमच्या पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदार संघ निवडावा लागला……सुज्ञास फार न सांगावे लागे!! जलयुक्त शिवार , चिक्की घोटाळा , मुंबई बँक घोटाळा ते PWD1/2 pic.twitter.com/oEbMSK41TC
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 3, 2021
याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा M.Phil करत आहेत. छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, चंद्रकांतदादांनी आपल्या आजुबाजूला पाहिले तर भाजपमधील अनेक नेतेही जामिनावरच बाहेर आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले होते-
छगन भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात . निर्दोष सुटलेले नाहीत त्यामुळे तुम्ही फार बोलू नका. नाही तर महागात पडेल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला होता.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.