बदामाचा खुराक चालू करा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होऊन डोक्याला चालना मिळेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली येथे 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यातील 1 दहशतवादी मुंबईतील आहे. दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकार वर निशाणा साधला. आपली पोलीस फौज सरकारने100 कोटी मोजायला ठेवली आहे का असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपालीताई चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अशा रीतीने ताईंची बौद्धिक पातळी किती सुमार दर्जाची आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्रद्वेषाने ह्या ताईंना एवढं पछाडलं आहे की हे दहशदवादी दिल्लीत पकडले असताना त्यांना महाराष्ट्रात पकडलं असल्याचं बरळत आहेत. असे रुपाली चाकणकर यांनी म्हंटल.

व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईंनी उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होऊन त्यांच्या डोक्याला योग्य ती चालना मिळेल असा टोला देखील त्यांनी लगावला.

You might also like