हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत असून हा तुटवडा राज्य सरकारकडून जाणुनबुजून तयार केला जातोय, असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला होता यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय अशा शब्दांत त्यांनी दरेकरांवर निशाणा साधला.
एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत , आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये. असे रुपाली चाकणकर यांनी म्हंटल.
एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत , आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये. अशी 1/2 https://t.co/ciFSw4xSYX
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 10, 2021
अशी वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय.नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे , ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो. असा टोलाही त्यांनी लगावला.
वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय.नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे , ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 10, 2021
दरेकर नक्की काय म्हणाले होते-
राज्यात कोरोना लसींचा मुबलक साठा आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष उत्पन्न करण्यासाठी ठाकरे सरकार जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नसल्याचा गंभीर आरोप दरेकर यांनी केला. लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण होता कामा नये. मात्र, ठाकरे सरकार केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट आखून काम करत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.