भाजप देशात जातीय विष पसरवत आहे ; शरद पवारांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्ष देशात जातीय विष पसरवत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार आज झरखंड येथील मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले, “बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीय विष पसरवत आहे. शेतकरी १०० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत, पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. मात्र दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही.”

दरम्यान यावेळी त्यांनी झारखंडचा लोकल बॉय तथा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर स्तुतीसुमने उधळली. राहुल द्रविडने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर मी सचिनला विचारलं की संघाचं नेतृत्व कोण करणार? त्यावेळी त्याने धोनीच्या नावाची शिफारस केली. तो म्हणाला “आपल्याकडे एक खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय करू शकतो आणि त्यानंतर धोनीला ही जबाबदारी देण्यात आली, ज्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेटला जगभरात लोकप्रियता मिळाली. एक अढळ स्थान मिळालं, असं शरद पवार म्हणाले.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like