हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात २ दिवसांपूर्वी भेट झाल्याची माहिती समोर येत आहे
शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार ही बैठक झाल्याचे समजत आहे संसदेतील गोंधळावर मार्ग काढण्यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राच्या एकूण राजकीय परिस्थिती आणि सध्या महापुरामुळे राज्यावर आलेले संकट यावर देखील चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली होती. देशातील बँकिंग आणि शेती क्षेत्रावर चर्चा झाल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. तसेच पवारांनी मोदींना भलेमोठे पात्र पाठवून काही सल्ले देखील दिले होते