हेलिकॉप्टर दुर्घटनेवर पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तामिळनाडूत संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे निधन झाले आहे. या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही घटना अतिशय धक्कादायक, चिंताजनक आणि दु:खदायक असल्याचे म्हटले आहे. यावेळी पवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताचा एक जुना किस्सा सांगितला. तसेच या अपघातातून कसे वाचलो याचा थरारक अनुभव सांगितला.

सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. त्यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्ट होती आणि गेल्या चार दशकांतील त्यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा नेहमीच स्मरणात राहील. ही घटना देशाच्या दृष्टीने अतिशय दु:खदायक, चिंताजनक आणि काळजी करणारी आहे. अपघातातील मृत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत’, अशा शब्दात पवार यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

पवारांनी सांगितला तो थरारक किस्सा

यावेळी शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यातील एक थरारक किस्सा सांगितला. पवार म्हणाले, एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे ज्यायला मर्यादा आल्या. ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं. आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं. पण मला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळेमहाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वात उंच शिखर नाही. ते 5 हजार फुटाच्या वर नाही. तेव्हा मी तातडीने पायलटला सांगितलं की आपण ७ हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. ते हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करुन सुखरुपपणे आम्ही उतरू शकलो.