हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोहित कंबोज यांनी अनेक आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण माहिती दिली. क्रूज ड्रग्ज प्रकरण हे पूर्णपणे बनावट आहे. मी आतापर्यंत या प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत. आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत गेला नाही. त्याला बोलावले गेले. प्रतिक गाभा आणि सचदेवने आर्यनला बोलावले आहे. हे किडनॅपिंगचं प्रकरण होते, असा खुलासा मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत ड्रग्ज प्रकरणात महत्वपूर्ण माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, मोहित कंबोजच्या साल्यामार्फत ड्रग्ज व आर्यन खान अपहरण प्रकरणाचा खेळ खेळला गेला आहे. किडनॅपिंगचा मास्टर माइंड हा मोहीत कंबोज आहे. त्याच्याकडून खंडणीवसूल करण्याचे काम केले जाते. एनसीबी अधिकारी समीर वानखेडेशी त्याचे चांगले संबंध आहेत.
वास्तविक पाहता आर्यन खानचे प्रकरण हे पूर्णपणे वेगळे आहे. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन खोटे आरोप केले आहेत. त्याने लोकांची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. समीर वानखेडे याने पत्रकार परिषद घेत ड्रग्ज कारवाईबाबत माहिती दिली. त्यावेळी त्याने १४ लोकांना अटक केल्याचे सांगितले. पण या 14 लोकांची नावे सांगितली माहिती. वानखेडे आणि कंबोजचे चांगले संबंध आहेत. त्यांचे व्हिडीओ लवकरच सर्वांपुढे आणणार आहे. ड्रग्जचा धंदा सुरू राहावा हेच वानखेडेंना वाटत आहे. बॉलिवूडमध्ये कोण ड्रग्ज घेते याची माहिती घेऊन वानखेडेंनी दहशत निर्माण केली आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/187398976897758
पूर्वीच्या काँग्रेसच्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या एका नेत्याच्या मागे मागे मोहित कंबोज फिरायचा. कंबोजने 1100 कोटी रुपयाचा घोटाळा केला. सरकार बदलल्याने तो भाजपात गेला. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचे पद देण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. ज्यावेळी सीबीआयने कारवाई केली त्यावेळी कंबोज हा भाजपमध्ये गेला. त्यानंतर सर्व कारवाई बंद झाली असल्याचे मलिक यांनी सांगितले.