देशातील तुरुंगांचेही खासगीकरण केले काय?; संजय राऊतांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांवर कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपमधील नेत्यांकडून दिवाळीनंतर काही मंत्री जेलमध्ये जाणार असल्याचे सांगत आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. ईडी, सीबीआय, एनसीबी या तपास यंत्रणा ज्याप्रकारे काम करीत आहेत त्यावरून एक जाणवत आहे की, देशातील तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही मोदी सरकारने खासगीकरण केले काय? असा सवाल राऊतांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मोदी सरकावर निशाणा साधला. मोडी सरकारने अनेक गोष्टींचे खासगीकरण केले आहे. आता रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सर्वच गोष्टी खासगी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना, मंत्र्यांना तुरुंगात टाकू, असे भाजपचे नेते सांगत आहेत.

या भारत या देशात मोदी है तो मुमकीन है. आपल्या देशातील जनतेला 2024 पर्यंत हे सहन करावेच लागणार आहे. संपूर्ण देशच हळूहळू तुरुंग होताना दिसत असल्याची टीका राऊत यांनी केली केली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष महागाईवर बोलत नाही. पेट्रोल 5 रुपयांनी कमी केले म्हणून ते खूप बोलत आहेत. पण 5 रुपये कमी करूनही पेट्रोल-डिझेल शंभरीपार आहे. आज पेट्रोल 115 रुपये आणि डिझेल 107 रुपये. म्हणजे शंभरीचा पारा उतरायला तयार नाही, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

You might also like