हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आज विविध मान्यवरांनी जाऊन अभिवादन केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनीही या ठिकाणी जाऊन अभिवादन केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंना टोला लगावला आहे. “अन्यायाविरोधात लढाई लढल्यानंतर काहीजण या ठिकाणी येतात आणि अभिवादन करतात, असे मलिक यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब हे कोणत्या एका धर्माचे नाही हे लोकांना कळले पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांना कोणी स्वीकारत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, आज समीर वानखेडे या ठिकाणी आले त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करीत त्यांच्या कार्याला नमन करत असेल तर चांगले आहे.
आज वानखडेंनी या ठिकाणी येऊन अभिवादन केले हे चांगले आहे. पण आजच्या घडीला जयभीम नावाचा एक चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. त्यात बाबासाहेबांचा एकही उल्लेख नाही किव्हा नावाचा जयघोष पण नाही. म्हणजे जयभीम म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढाई असे म्हंटले जाते., असे मलिक यांनी सांगितले.