हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून अनेकवेळा राज्यपालांवर निशाणा साधण्यात आला आहे. राजभवन हे भाजपचे कार्यालयच असल्याची टीका यापूर्वीही करण्यात आल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल व भाजप कार्यकर्ते यांच्या भेटीवरून राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल भवन आता तर राजकीय अड्डाच झालेला आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. मलिक यांनी ट्विट करून राज्यपाल भगतसिह कोश्यारी हे भाजपचेच नेते असल्याचे म्हंटले. भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही कारण राज्यपाल भवन हे आता राजकीय अड्डा झालाय. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशी माहिती मिळाली आहे. मात्र, वारंवार कार्यकर्ते भेटत आहेत. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी भाजपचे असल्याचे दिसत असल्याचे मलिक यांनी म्हंटले आहे.
भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही कारण राज्यपाल भवन हे आता राजकीय अड्डा झालाय, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री ना. @nawabmalikncp यांनी केला. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात असल्याने त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. pic.twitter.com/RZT8DU37Ru
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 30, 2021
भाजपचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात. आताही भाजप कार्यकर्ते राज्यपालांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून एकच गोष्ट लक्षात येते कि राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झालाय यात कुणाचं दुमत नाही, असे मलिक यांनी राज्यपालांवर टीका करताना म्हंटले आहे.