हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला जात असल्याने यावरून फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मलिक यांच्यावर टीका केली होती. अमृता फडणवीस यांच्या टीकेला मलिक यांची कन्या निलोफर मलिक खान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “सत्य तुमच्या बाजूने आहे तर घाबरता कशाला? असा सवाल निलोफर खान यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक खान यांनी ट्विट करून अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “तुमच्याकडे लपवण्यासारखे काहीच नसेल तर तुम्हाला मलिक यांच्या पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. सत्य जर तुमच्या बाजूने आहे तर भीती बाळगू नका. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील, असे निलोफर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
If there aren’t any hidden skeletons in 1’s closet, press conferences shouldn’t bother them. When u have the truth by ur side, fear seldom has any hold. If there are any malicious intentions, they will be exposed. Our only agenda should be the growth & progress of Maharashtra. https://t.co/8F0lDbn1XC
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 9, 2021
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते मलिक यांनी ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या जयदीप राणाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावरून अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत नवाब मलिक यांचा बिगडे नवाब असा उल्लेख केला होता. अमृता फडणवीस यांच्या टीकेला नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक खान यांनी प्रत्युत्तर दिले आहे.