हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रो, कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी कोरोनाचे नियम पाळत भरपूर शॉपिंग करावे, असा सल्लाही दिला. त्यांच्या या विधानावरून आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे. “पुणेकरांनी काय करावं हे सांगण्यापेक्षा अमृतावहिनींनी आपल्या गाण्याकडं लक्ष द्यावं,” असे चाकणकर यांनी म्हंटले आहे.
अमृता फडणवीस यांना टोला लगावत चाकणकर यांनी म्हंटले आहे कि, रुग्णसंख्या आटोक्यात आहे म्हणून लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन करायचे. आणि पुन्हा रुग्णसंख्या वाढली कि सरकारवर खापर फोडायचे, असे डबल ढोलकी वाजविण्याचे काम अमृतावहिनींचे चालू आहे. यापेक्षा पुणेकरांनी काय करावे आणि काय करू नये? हे सांगण्यापेक्षा अमृतावहिनींनी आपल्या गाण्याकडं लक्ष देत गाण्याच्या छंदावर काम केले तर बरे होईल, असा सल्ला चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे.
अमृता वहिनींनी आपल्या गाण्याच्या छंदावर काम करावं…
(१/२) pic.twitter.com/3xmKhhuo2q— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 5, 2021
पुणे येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. यावेळी त्यांनी पुणेकरांना कोरोनाचे नियम पाळत शॉपिंगसाठी घराबाहेर पडा, असा सल्लाही दिला होता. त्यावरून त्यांच्यावर पहिल्यांदा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली. तर त्यांच्यानंतर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला आहे.