हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी दरड कोसळून पूरस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूरग्रस्त असलेल्या १६ हजार कुटुंबांना जीवनाश्यक वस्तू पुरवणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना 16 हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. तसेच त्यांना औषधे आणि लहान मुलांसाठी बिस्किटेही पाठवली जाणार आहेत, असं. येत्या दोन ते तीन दिवसात ही मदत पुरवली जाणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं
महाराष्ट्राला अशा संकटांचा अनुभव आहे. माळीणमधील दुर्घटनेनंतर सरकार आणि स्थानिक नेते यांनी पुनर्वसन केलं होतं. पुनर्वसन कसं करतात याचा अनुभव घेतला,” असं शरद पवारांनी सांगितलं. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. पूरस्थिती अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल,” असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.