चंद्रकांत दादा आपल्या वया इतकी शरद पवारांची संसदीय कारकीर्द; चाकणकरांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केल्याने याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिउत्तर दिले. “चंद्रकांत दादा आपलं जितक वय आहे तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे”, असा टोला चाकणकर यांनी ट्विट करत पाटलांना लगावला.

चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट्मधे म्हंटल आहे की, “गेल्या दिड वर्षापासून राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडली आहे. हे संपुर्ण महाराष्ट्र पाहत आहे. या नियुक्त्या का रखडल्या आहेत? यामध्ये राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार काही नाव राज्यपांलाकडे देते. राष्ट्रीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ती नाव मान्य करतात. मात्र, राज्यात आपली सत्ता नसल्याने केंद्र सरकार राज्यपालांना हाताशी धरुन अडवणूक करत आहे.

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1427539978200907778?s=20

या विषयावर बोलताना काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या बाजूने बोलत आणि त्यांच्या मदतीला धावून जात, शरद पवार यांच्यावर टीका केली. राज्यपाल काय भाजपाचे पदाधिकारी नाहीत. चंद्रकांत पाटील आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी कि, आपले जितके वय आहे ना तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे. चार दिवस दिल्लीत थांबूनही तुम्हाला अमित शाहा यांनी भेट नाकारली याबाबत तुम्ही आत्मचिंतन करावे,” असा टोला चाकणकर यांनी लगावला.

Leave a Comment