फलटण शहरातील व्यापाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा भाजपच्या नगरसेवकाचा आरोप

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

फलटण शहरातील व्यापारी सागर सुधीर शहा यांच्यावर राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांच्या सांगण्यावरून गुंड अभिजीत जानकर आणि इतर काही गुंडांनी मिळून प्राणघातक हल्ला केला असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक अनुप शहा यांनी केला आहे. या घटनेने फलटण शहरात खळबळ उडाली आहे.

फलटण शहरातील व्यापारी सागर शहा यांच्या डोक्यावर आणि दंडावर चाकूने वार करण्यात आले आहेत. फलटण नगर परिषदेमधील सत्ता आपण हरणार असल्याची भीती मनात धरून सत्ताधारी व्यापाऱ्यांवर दहशतीचे वातावरण तयार करत असून भारतीय जनता पार्टी व्यापार्‍यांच्या पाठीशी ठाम उभी असून कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन नगरसेवक अनुप शहा यांनी केला आहे.

दरम्यान, या भ्याड कृत्याचा भाजपचे नगरसेवक अनुप शहा यांनी जाहीर निषेध केला आहे. या घटनेची नोंद फलटण पोलिसांत झाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.