दारुड्या मुलाने बापावरच केले कुऱ्हाडीने वार

औरंगाबाद – घरात सुनेला मारहाण करणाऱ्या दारूड्या मुलाला समजावण्यासाठी गेलेल्या बापा वरच मुलाने कुर्‍हाडीने वार केल्याची घटना काल वैजापूर तालुक्यात घडली.‌ कडू बागुल (रा. खंडाळा) असे मारहाण करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कडू बागुल याने बुधवारी सकाळी दारू पिऊन पत्नी सविता आईला मारहाण केली. याचवेळी शेजारी राहत असलेले त्याचे वडील रामदास व आई शोभा यांनी भांडन सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु कडू ने त्यांचा डाव्या हातावर कुऱ्हाडीने वार केले.

याप्रकरणी गोविंद बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कडू बागुल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

You might also like