धनंजय महाडिकांचं पण ठरलं ! या दिवशी करणार भाजपमध्ये प्रवेश

0
83
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये जाणार असणाऱ्या शक्यतेला आता मूर्त रूप मिळत असल्याचे दिसते आहे. कारण त्यांनी गुप्तपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून येत्या ३१ ऑगस्ट रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असे देखील सूत्रांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी शरद पवारांबद्दल केले हे विधान

धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले मात्र पक्षांतर्गत माजलेल्या गटबाजीमुळे त्यांचे पक्षातीलच काही नेत्यांनी काम केले नाही. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्धार केला. तसेच त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक भाजपचे विद्यमान विधानसभा आमदार असल्याने धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाची पृष्ठभूमी आधीच चांगली आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

जयदत्त क्षीरसागरांनी ५० कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतले ; पुतण्या संदीप क्षीरसागरने केले गंभीर आरोप

दरम्यान धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना भाजपमध्ये राज्य स्तरावरील मोठे पद दिले जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यांना नेमके कोणते पद दिले जाणार याबद्दल देखील उत्सुकता आहे. तर धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगलेच खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण येथे राष्ट्रवादीला तगडा मराठा नेताच उरणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी भविष्यात हि पडलेली बाजू कशी सावरते ते देखील बघण्यासारखे राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here