तर भाजपने महाराष्ट्रात आकाश पाताळ एक केलं असत : रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून सुमारे १०० हुन अधिक मृतदेह वाहून आल्याची घटना घडली आहे. यावरून आता राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

बिहारमध्ये काल गंगा नदीत 100 पेक्षा जास्त प्रेतं तरंगताना आढळली. हीच घटना महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पाताळ एक केलं असतं. दोन चार मंत्र्यांचे राजीनामे मागितले असते, राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असती. मृत्यूचं भांडवल करणं त्यांनाच जमतं. असं म्हणत चाकणकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मृतदेहांचा पडलेला खच यांचा फोटो ट्विटरवर टाकला आहे. तसेच त्यावर “भाजपा गंगा मे बहतीं लाशें”, असही लिहलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरजेडीतील प्रमुख असलेले लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र प्रताप यादव यांनी ट्विट करीत बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून भाजपवर निशाणा साधला.

उत्तर परदेशातून सुमारे १०० हुन अधिक मृतदेह वाहून आल्याने ते मृतदेह उत्तर प्रदेश सरकारच्या हद्दीतून आले आहेत त्यामुळे मृतदेहांच्या खच हटवणार नाही, असे म्हणत स्थानिक प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे यावरून अधिकच राजकारण तापले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेची तुलना महाराष्ट्राशी केली आहे. या राज्यात जर अशी घटना घडली असती तर, येथील भाजप गप्प बसली असती का? असाही सवाल चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.