सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकासनगर येथे सार्थक महिला बचत गट फेडरेशन आणि जयवंत प्रतिष्ठान यांच्यावतीने रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रपती राजवटीबाबतचा निर्णय न्यायालय जो घेईल तो आम्हाला मान्य असेल. तसेच न्यायालयाच्या निर्णयाला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे गोऱ्हे यांनी म्हंटले.
रणरागिणींचा सन्मान कार्यक्रमास सार्थक महिला बचत गटाच्या अध्यक्ष वैशाली शिंदे आ. शशिकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी गोऱ्हे यांनी माध्यमांशी संवाद असधला. यावेळी त्या म्हणाल्या की समाजात ज्या स्त्रियांनी बदल घडवलेला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. अशात सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. यासाठी अशा महिलांचा रणरागिणींचा सन्मान करण्यात आला आहे.
राष्ट्रपती राजवटीबाबत न्यायालय जो निर्णय घेईल त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार : डॉ. नीलम गोऱ्हे pic.twitter.com/tU76PoYgMU
— santosh gurav (@santosh29590931) April 1, 2023
कार्यक्रमापूर्वी गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्याची बैठक पार पडली. यावेळी त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडीचा वरिष्ठ पातळीवरचा समन्वय पक्का आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे. पण आताच्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने तुम्हाला कशा पध्दतीने जनतेला न्याय मिळवून देता येईल त्याचा फॉर्म्युला पक्षापुढे ठेवा. त्यावर पक्षाच्या निर्देशानुसार पुढे जाता येईल, असा सल्ला डॉ. गोन्हे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.