New Business Idea : घरबसल्या कमी खर्चात ‘हे’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : जर आपल्याला नोकरीसोबतच काही अतिरिक्त पैसे कमावायचे असतील तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच महत्वाची ठरू शकेल. कारण आज आपण एका अशा व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत ज्याद्वारे अगदी कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवता येईल. तर आज आपण अगरबत्ती बनवणे, लोणची बनवणे, टिफिन सर्व्हिस सारख्या व्यवसायांबाबतची माहिती जाणून घेउयात….

Easy Guide For Agarbati {incense} Stick Business Plan In 7 Step - Inventiva

अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय

हे लक्षात घ्या कि, अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय घरातच सुरू करता येईल. अगरबत्ती बनवण्यासाठी मिक्सर मशीन, ड्रायर मशीन आणि मुख्य उत्पादन मशीनची गरज भासेल. याशिवाय आपल्याला अगरबत्ती तयार करण्यासाठी डिंक पावडर, कोळशाची पावडर, काड्या, नार्सिसस पावडर, सुगंधी तेल, पाणी, सुगंध, फुलांच्या पाकळ्या, चंदन, जिलेटिन पेपर, सॉ डस्ट, पॅकिंग सारखे साहित्य लागतील. भारतात अगरबत्ती बनवण्याची मशीन 35,000 ते 175000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. याच्या मदतीने अवघ्या 1 मिनिटांत 150 ते 200 अगरबत्ती बनवता येतात. जर हाताने अगरबत्ती बनवली तर त्यासाठी 15,000 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक लागेल. New Business Idea

How to Start a Pickle Business: Steps and Investment Tips

लोणचे बनवण्याचा व्यवसाय

लोणचे हे जवळपास प्रत्येक घरामध्ये खाल्ले जाते. ज्यामुळे त्यासाठी बाजारात वर्षभर मागणी देखील असते. तसेच हा व्यवसाय घरबसल्या करता येण्यासारखा आहे. यामध्ये सुरुवातीला 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. याद्वारे दरमहा किमान 30,000-35,000 रुपये आणि वार्षिकरित्या लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. आपण बनवलेले लोणचे ऑनलाइन, घाऊक तसेच किरकोळ बाजार किंवा किरकोळ पद्धतीनेही विकता येईल. हे लक्षात घ्या कि, लोणचे बनवण्याच्या व्यवसायासाठी आपल्याला अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून लायसन्स घ्यावे लागेल. यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. New Business Idea

How To Start A Home Tiffin Service Or Dabba Service In India

टिफिन सर्व्हिस

हा व्यवसाय देखील घरबसल्या करता येण्यासारखा आहे. तसेच हा व्यवसाय 8000 ते 10,000 रुपयांमध्ये सुरू करता येईल. याशिवाय जर लोकांना आपण बनवलेले जेवण आवडले तर दर महिन्याला हजारो रुपये कमवता येतील. आजकाल अनेक स्त्रिया घरबसल्या या व्यवसायाद्वारे चांगली कमाई करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे त्याचे मार्केटिंगही सहजपणे करता येते. New Business Idea

सरकारकडून मिळेल मदत

केंद्र सरकारकडून कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. याद्वारे घरबसल्या व्यवसाय सुरू करू शकता.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर
Gold Price Today : देशांतर्गत बाजारात सोने-चांदी वधारली, तपासा आजचा नवीन दर
DigiLocker अ‍ॅपद्वारे अशाप्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये ठेवा Driving Licence
Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या
Bank Crisis : 2 आठवड्यात बुडाल्या 3 अमेरिकन बँका, अशावेळी भारतीय बँकांमध्ये आपले पैसे कितपत सुरक्षित आहेत जाणून घ्या