शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती तर सर्वाधिक संपत्ती असणारे पहिले ३ खासदार काँग्रेसचे

1
60
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली असून २३ मी रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत.या वर्षी लोकसभेचे जे निवडूण आलेले खासदार आहेत त्या खासदारांपैकी ४७५ खासदार करोडपती असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे.

मोदींच्या मंत्रीमंडळात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी

एकेकाळी गरिबांच्या मुलांना खासदार आमदार करणारी शिवसेना आता करोडपती लोकांना तिकीट देऊ लागली आहे का असा सवाल देखील सर्वत्र विचारला जातो. तर मराठी माणूस दबक्या आवाजात हे देखील म्हणतो कि बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. याचाच प्रत्येय येणारी घटना या लोकसभा निवडणुकीतून समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेनेचे खासदार करोडपती असल्याची. अशा आवस्थेत सर्वांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे शिवसेनेने उमेदवारांची संपत्ती बघून त्यांना तिकीट दिले का?

विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा

दरम्यान निवडून आलेल्या करोडपती खासदारात पहिले तीन खासदार एकाच पक्षाचे आहेत. ते म्हणजे काँग्रेसचे. मध्य प्रदेशात काँग्रेसला एकाच जागी विजय मिळवता आला आहे. ती जागा म्हणजे कमलनाथ हे प्रतिनिधित्व करत होते ती जागा. या जागी कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे विजयी झाले आहेत. नकुलनाथ त्यांच्या नवे तब्बल ६६३ कोटी रुपयांची संपत्ती आहे.ते देशातील सर्वात श्रीमंत खासदार आहेत. तर दुसऱ्या स्थानी तामिळनाडूतील कन्याकुमारी मतदारसंघातील खासदार वसंत कुमार यांचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती ४१७ कोटी एवढी आहे. तिसऱ्या क्रमांकाची संपत्ती कर्नाटकमधील बेंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के.सुरेश यांची आहे. त्यांच्याजवळ ३३८ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय

स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील

हा नेता आहे भाजपच्या भव्य विजयाचा शिल्पकार

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित ४८ खासदार ; बघा एका क्लिकवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here