मेलबर्न : वृत्तसंस्था – आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे (T -20 World Cup) आता सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये (T -20 World Cup) भारताचा इंग्लडबरोबर तर पाकिस्तानचा न्यूझीलंड बरोबर सामना होणार आहे. सुपर 12 फेरीत अनेक संघांचा खेळ पावसानं खराब केल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे आता जर सेमी फायनलमध्येही तसंच झालं तर विजेता कसा ठरणार असा प्रश्न सर्वाना पडला असेल. पण त्यासाठी आयसीसीनं आधीच प्रयोजन करुन ठेवलेलं आहे.
सेमी फायनलमध्ये पाऊस आला तर…
सेमी फायनलचे (T -20 World Cup) सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड भारताशी भिडणार आहे. पण सेमी फायनलमध्ये पाऊस पडला तर काय? तर आयसीसीनं सेमी फायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. याचा अर्थ जर पावसामुळे सामना 9 तारखेला खेळला गेला नाही तर 11 तारखेला पूर्ण होऊ शकतो.तसेच राखीव दिवशीही पावसानं सामना होऊ दिला नाही तर गटात अव्वल स्थानी असलेला संघ पुढे जाईल.म्हणजेच भारत आणि न्यूझीलंडला याचा फायदा होऊ शकतो.
फायनलचं काय?
जर फायनलमध्ये (T -20 World Cup) देखील पावसामुळे सामना होऊ शकला नाहीतर आयसीसीच्या नियमानुसार अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन संघांपैकी जो सुपर 12 मध्ये अव्वल असेल त्या संघाला विजेतेपद देण्यात येईल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भारतीय संघाला हा नियम फायद्याचा ठरणार आहे. कारण ग्रुप 2 मध्ये 5 पैकी 4 सामने जिंकून टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे.
हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी