साऊदम्पटन : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सर्वांत अनुभवी फलंदाज रॉस टेलरने एक दमदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यामध्ये रॉस टेलरने पहिल्या डावात फक्त 11 धावा केल्या आहेत. या 11 धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. WTC Final सामन्याआधी टेलरच्या नावावर 17 हजार 796 धावा होत्या. यानंतर त्याने भारताविरुद्ध पहिल्या डावात 11 धावा करत त्याने 18 हजार धावांचा टप्पा पार करत त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रॉस टेलरची कामगिरी
रॉस टेलरने तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 18 हजार 7 धावा केल्या आहेत. या धावांपैकी कसोटी सामन्यांत 7 हजार 517 रन्स आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 8 हजार 581 रन्स आहेत. त्यासोबतच टी-20 सामन्यात देखील त्याने 1 हजार 909 रन्स केले आहेत. रॉस टेलरनंतर न्यूझीलंडकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा माजी कर्णधार फ्लेमिंगच्या नावावर आहेत. फ्लेमिंगने 15 हजार 289 रन्स केले आहेत.
सक्रिय खेळाडूंमध्ये तिसऱ्या नंबरवर
रॉस टेलरने 18 हजार धावांचा टप्पा पार करत सध्या सक्रिय फलंदाजामध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या यादीमध्ये अव्वल स्थानी भारताचा कर्णधार विराट कोहलीचा नंबर लागतो. विराटच्या नावावर टेस्टमध्ये 7 हजार 490, वनडेमध्ये 12 हजार 169 आणि टी-20 मध्ये 3 हजार 159 रन अशा मिळून 22 हजार 862 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. तर दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल याचा नंबर लागतो. ख्रिस गेलच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 7 हजार 214, वनडेमध्ये 10 हजार 480 आणि टी-20मध्ये 1 हजार 656 धावा अशा मिळून 19 हजार 359 धावा आहेत.